मुंब्रा येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या २ धर्मांधांना अटक 

१ लाख २९ सहस्र रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

ठाणे, १२ ऑगस्ट (वार्ता.) – मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयासमोर काही जण मेफेड्रॉन (एम्.डी.) हा अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या परिसरात पोलिसांनी सापळा रचून इरफान सय्यद (वय ३९ वर्षे) आणि रज्जाक रंगरेज (वय ३५ वर्षे) यांना कह्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७२ ग्रॅम वजनाचा एम्.डी. हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. याची किंमत १ लाख २९ सहस्र ६०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका 

लोकांना नशेच्या आहारी नेऊन भारताची नवी पिढी उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच अमली पदार्थांच्या व्यापाराचे विशाल जाळे देशात पसरले आहे !