तब्बल ११ वर्षांनंतर जिल्हा न्यायालयाचा आदेश !
अमरावती – एका प्रकरणी गुन्हा नोंद न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ३) आर्.व्ही. ताम्हणेकर यांनी तत्कालीन साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ठाकरे (वय ६४ वर्षे ) यांना १ वर्षाचा कारावास आणि १५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा १२ ऑगस्ट या दिवशी सुनावली आहे. न्यायालयाने ११ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल दिला आहे.
शहरातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस्.आय.) प्रकाश ठाकरे यांनी तक्रारदार दिलीपराव धस्कट (रा. शेंदोळा (बु.)) यांना ३ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या वेळी प्रथम ठाकरे यांनी ३५० रुपयांची लाच घेऊन उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे ठरले होते. या प्रकरणी धस्कट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने ८ एप्रिल २०११ या दिवशी ठाकरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर या प्रकरणी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने ठाकरे यांना वरील शिक्षा सुनावली.
संपादकीय भूमिका११ वर्षांनंतर दिलेला न्याय हा अन्यायच नव्हे का ? |