महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केल्याप्रकरणी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार  !

मुंबई – राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केला आहे. या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय पालटू शकतात ?’, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने ९ प्रभाग वाढवून मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना केली होती. तसेच आरक्षण सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर नवनियुक्त सरकारकडून निवडणूक घोषित होणे अपेक्षित होते; मात्र या सरकारने २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे मत आहे.