देव नांदतो भक्ता घरी ।

श्री. तुकाराम लोंढे

देव नांदतो भक्ता घरी ।
देव आहे भक्तांचा कैवारी ।। १ ।।

देह झिजो देवाच्या चरणांवरी ।
तुम्ही जाऊ नका हो दुरी ।। २ ।।

आपण करूया देवाची चाकरी ।
तन मन धन अर्पूया त्यांच्या चरणी । । ३ ।।

सद्गुरु कृपा होईल आपल्यावरी ।
आनंद होईल आपल्या अंतरी ।। ४ ।।

मग मोक्ष नाही हो दूरी ।
माथा ठेवूया सद्गुरु चरणांवरी ।। ५ ।।

– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक