श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७४ वर्षे) !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन (११.८.२०२२) या दिवशी पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त श्रीमती वंदना करचे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्या चरणी ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. इतरांचा विचार करणे

‘एकदा पू. माई आजारी होत्या. तेव्हा ‘प.पू. दास महाराज यांना त्याचा त्रास व्हायला नको. प.पू. दास महाराज यांची काळजी वाढली, तर त्यांच्या साधनेत अडचण येईल’, असा विचार करून पू. माईंनी प.पू. दास महाराजांना स्वतःच्या आजारपणाविषयी काही सांगितले नाही.

२. साधकांना साधनेत साहाय्य करणे

अ. एखाद्या साधकाला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर ‘त्या साधकाचे साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, हे त्या आवर्जून विचारतात.

आ. ‘आपत्काळ तीव्र आहे. आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी साधना वाढवा !’, असे त्या सर्व साधकांना सांगतात. ‘सर्वांची साधना व्हावी’, अशी त्यांची तळमळ असते.

३. स्थिरता

प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यासाठी गेल्यावर त्यांच्या शारीरिक स्थितीत बर्‍याच वेळा चढ-उतार झाले. ते मध्यंतरी आजारी असतांना पू. माई अतिशय स्थिर होत्या.

४. त्यागी वृत्ती

प.पू. दास महाराज रामनाथी आश्रमात वास्तव्याला गेल्यापासून पू. माई बांदा येथील ‘गौतमारण्य’ आश्रमाचे व्यवस्थापन आणि नियोजन यांचे दायित्व पहातात. ‘प.पू. दास महाराज हे रामनाथी आश्रमात राहिल्याने त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत गुरुदेवांना अपेक्षित असे योगदानही देता येईल’, असा त्यांचा विचार असतो.

५. श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा

प्रभु श्रीराम आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ‘सर्वकाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बघतील’, असे त्या म्हणतात.’

– श्रीकृष्णाचा पेंद्या,
श्रीमती वंदना करचे, पुणे (५.८.२०२२)

पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक यांनी स्वतःचा वाढदिवस आणि रक्षाबंधन या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले प्रार्थनारूपी पत्र !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच नारळी पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक (पू. (सौ.) माई) यांचा ७४ वा वाढदिवस होता. स्वतःचा वाढदिवस आणि रक्षाबंधन या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पू. माई यांनी लिहिलेले प्रार्थनारूपी पत्र पुढे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले),

आपल्या चरणी माझा भावपूर्ण शिरसाष्टांग नमस्कार !

१. श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीवर कृष्णप्रेमाची अखंड कृपा करण्याची प्रार्थना करणे

हे श्रीकृष्णस्वरूप बंधुराया, आपल्या अपार प्रीतीमय कृपेमुळेच प्रतिवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी आणि खाऊ पाठवत आहे. तुमच्या बहिणीची प्रीतीमय राखी स्वीकारून बहिणीवर कृष्णप्रेमाची अखंड कृपा करावी.

२. प.पू. डॉक्टर त्यांच्या भगिनीला जन्म-मृत्यूच्या भवसागरातून मुक्त करून उद्धारून घेऊन जात आहेत, यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करणे

आजच्या शुभदिनी माझा वाढदिवसही आहे. गुरुमाऊली, त्याकरता तुमचा आशीर्वाद आणि गुरुकृपा तुमच्या भगिनीवर अखंड राहू दे. प.पू. डॉक्टर, तुम्ही मला तुमची भगिनी म्हणून स्वीकारले आहे आणि या भगिनीकडून अष्टांगमार्गाने गुरुकृपायोगानुसार साधनाही करून घेत आहात. या जन्म-मृत्यूच्या भवसागरातून मुक्त करून उद्धारून घेऊन जात आहात. तुमच्या या अनंत कृपेसाठी मी श्रीकृष्णस्वरूप बंधुरायांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञ आहे.

गुरुमाऊली, ‘आम्हा उभयतांवर आपली कृपादृष्टी अखंड राहू दे’, अशी अनंत कोटी, परब्रह्मस्वरूप, सच्चिदानंदस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे !

– आपली भगिनी,
(पू.) सौ. लक्ष्मी रघुवीर नाईक, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (२०.८.२०२१)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.