भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !

ठाणे, ९ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी-वाडा महामार्गावरील कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यांत दुचाकी आदळून खाली पडली आणि मागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे अशोक काबाडी (वय ६५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भाग येथे खड्ड्यांमुळे आतापर्यंत ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाची चेतावणी दिली आहे. गेल्या अनेक मासांपासून खड्ड्यांच्या दुरुस्तीविषयीचे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे; मात्र ते दुरुस्त झालेले नाहीत. (नागरिकांचे मृत्यू होऊनही रस्ते दुरुस्त न होणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)