सौ. सुनीता वनारसे, वाई (जिल्हा सातारा)
१. जाणवलेली सूत्रे
अ. मला वातावरण आल्हादायक जाणवत होते.
आ. सोहळा चालू असतांना ‘एक फूलपाखरू सोहळ्याच्या ठिकाणचे चैतन्य ग्रहण करत आहे आणि त्या फुलपाखराच्या माध्यमातून ऋषिमुनी हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
इ. सोहळ्याच्या वेळी गरुडाने आकाशातून ३ प्रदक्षिणा घातल्या. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीरामचंद्राचा आशीर्वाद अन् चैतन्य मिळाल्यामुळे सर्वांना कृपाशीर्वाद प्राप्त झाला आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘या सोहळ्याला वरुणदेवता प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि सर्व साधक अन् आश्रम यांच्यावर चैतन्याचा वर्षाव करत आहे’, असे मला जाणवले.
उ. सोहळा संपल्यावर सूर्यदेवतेचे दर्शन झाले. तेव्हा ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी सूर्याचे प्रखर तेज आपल्याला मिळत आहे आणि तो सर्व साधकांना ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज प्रदान करत आहे’, असे मला वाटले.
२. अनुभूती
अ. घोषणा ऐकतांना माझ्या शरिरावर रोमांच आले.
आ. ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी मला वातावरणात पुष्कळ हलकेपणा, उत्साह, चैतन्य आणि आनंद जाणवत होता.
ई. सोहळा संपल्यावर मला चंदनाचा सुगंध जाणवला.
‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ असा अद्भुत सोहळा अनुभवता आला. त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉक्टर आणि सहसाधक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुनीता वनारसे, वाई, जिल्हा सातारा. (१२.६.२०२२)
सौ. सविता महेश गोजगेकर, बेळगाव
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ धर्मध्वजारोहणासाठी दोरी ओढत होत्या. त्या वेळी ‘साक्षात् देवता धर्मध्वजावर फुलांचा वर्षाव करत आहेत’, असे मला स्पष्ट दिसत होते.
२. धर्मध्वजारोहण झाल्यावर ‘श्रीकृष्णाचा चैतन्यमय प्रकाश ध्वजावर पडला आहे’, असे मला दिसले.
३. मला धर्मध्वजाच्या चहुबाजूंनी सोनेरी किरण पसरल्याचे दिसत होते.
हे गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), ही अनुभूती मला तुमच्याच कृपाशीर्वादाने अनुभवता आली. याबद्दल तुमच्या चरणी
कृतज्ञता !’ (११.६.२०२२)
श्रीमती अनिता भोसले, कराड, जिल्हा सातारा.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ धर्मध्वजाचे पूजन करतांना पुष्कळ चैतन्य मिळणे
प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या कृपेमुळेच मला धर्मध्वजपूजन विधीच्या वेळी उपस्थित रहाण्याची आणि त्यातील चैतन्य अनुभवण्याची संधी लाभली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मला विराट रूपात दिसत होत्या. मला सतत शंखनाद ऐकू येत होता. पूजन चालू झाल्यावर मला आकाशाच्या निळ्या प्रकाशात गुलाबी रंगाची छटा दिसली. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य मिळत होते.
२. ध्वजारोहणाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ध्वजारोहण करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘देवता, ऋषिमुनी आणि झाडे-वेली पुष्पवृष्टी करत आहेत.’
आ. ध्वजाच्या ठिकाणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, प.पू. गुरुमाऊली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ विराट रूपात दिसून त्यांच्यात विश्व सामावले आहे.
इ. सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होत आहे.
ई. ‘सद्गुरु आणि संत विश्वाच्या रक्षणासाठीच प्रकट झाले आहेत’, असे मी अनुभवत होते.
उ. ‘सृष्टी स्तब्ध झाली आहे’, असे मला जाणवले.
ऊ. मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येत होते.
ए. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ हसत असतांना त्यांचे मुखकमल तेजस्वी दिसत होते. त्या मला महालक्ष्मीसम भासत होत्या. ‘आम्ही सर्व साधक त्यांच्या वात्सल्याच्या कवचात सुरक्षित आहोत’, असे मला जाणवले.
गुरुदेवांनी मला ‘न भूतो न भविष्यति ।’, असे अनुभवायला दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’ (१२.६.२०२२)
अन्य अनुभूतीडोक्यापासून पायापर्यंत सूक्ष्मातून ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप लिहिल्यावर त्रास न्यून होणे मला शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असल्यास किंवा मला काहीही सुचत नसल्यास मी डोक्यापासून पायापर्यंत सूक्ष्मातून ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे लिहिते. तेव्हा माझा त्रास न्यून होऊन मला पुष्कळ हलकेपणा जाणवतो. ‘परात्पर गुरुमाऊली माझ्या समवेतच आहेत आणि तेच माझे रक्षण करत आहेत’, असे मी अनुभवते. मला आध्यात्मिक त्रास होत असतांना ‘परात्पर गुरुदेव माझ्यामध्ये आतून वीरवृत्ती जागृत करत आहेत आणि आध्यात्मिक त्रासांशी कसे लढायचे ?’, हेही मला शिकवत आहेत’, असे मला जाणवते. मी केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच जिवंत आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! – श्रीमती अनिता भोसले, कराड |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |