भारत मलेशियाला १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार !

‘तेजस’ लढाऊ विमान

नवी देहली – गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘रॉयल मलेशियन एअर फोर्स’कडून २ आसनी १८ ‘तेजस’ या भारतीय बनवाटीच्या लढाऊ विमानांची विक्री प्रस्ताव ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’पुढे ठेवण्यात आला होता. त्यानुसार भारत त्यांना ही विमाने पुरवणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने संसदेत दिली. वजनाने हलकी असलेली भारतीय बनावटीची ही  विशेष विमाने आहेत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेसह अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे देशही ‘तेजस’ या एकल इंजिन लढाऊ विमानाच्या (जेट) खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.

गेल्या वर्षी भारत सरकारने ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी विमान निर्मिती करणार्‍या आस्थापनास ८३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीसाठी ६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण वर्ष २०२३ पासून चालू होणार आहे.