रियाध (सौदी अरेबिया) – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबियाच्या दौर्याच्या वेळी मदीना येथील ‘मस्जिद-ए-नबावी’ या मशिदीला अपवित्र केल्याच्या प्रकरणी सौदी अरेबियाने पाकच्या ६ मुसलमान नागरिकांना दोषी ठरवले आहे. यांतील तिघांना १० वर्षांच्या, तर अन्य तिघांना ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह त्यांना प्रत्येकी ४ लाख २३ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पंतप्रधान शरीफ या मशिदीत आल्यानंतर दोषींनी या मशिदीमध्ये ‘चोर चोर’, अशा, तसेच शरीफ यांच्या पत्नीविषयीही आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या, तसेच मंत्री शाहजैन बुगती यांचे केसही ओढले होते.
संपादकीय भूमिकाभारतात एखाद्या मंदिराला अपवित्र केल्यावर कधी अशी शिक्षा होते का ? |