इतर साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती सांगितल्यानंतर ‘तो पूर्ण प्रसंग स्वतःविषयीच घडला आहे’, असा विचार मनात येऊन कृतज्ञता वाटणे

कु. मानसी अग्निहोत्री

जेव्हा एखाद्या साधकाचा भाव जागृत होतो किंवा त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात अनुभूती येते वा तो देवाची कृपा अनुभवल्याचे प्रसंग मला सांगतो, तेव्हा ‘माझाही भाव जागृत होतो’, असे मला जाणवते. स्वतःला काही अनुभूती आल्यास भाव जागृत होतो, ती गोष्ट वेगळी; पण ‘इतर साधकही परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगत असतांना माझा भाव जागृत होतो’, असे या काही दिवसांत मला अनुभवता आले. त्या वेळी ‘तो पूर्ण प्रसंग माझ्याविषयीच घडला आहे’, असा विचार मनात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होते.

– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक