कोल्हापूर युवासेनेच्या वतीने अनोखे वृक्षारोपण !

न्यू हायस्कूल कोल्हापूर येथे वृक्षारोपण करतांना युवासेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी

कोल्हापूर, २ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर युवासेनेच्या वतीने अनोखे वृक्षारोपण करण्यात आले. यात शिवसेना पक्षात आजच्या स्थितीला जे जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहिले, अशा प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्या नावाने एक झाड लावण्यात आले. हा उपक्रम शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल कोल्हापूर पेटाळा येथे करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हायुवा अधिकारी मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शाळेचे मुख्याध्यापक, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे यांसह अन्य उपस्थित होते.