हिंदूंनी मुलांना हिंदुस्थानचा भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, इंदूर, मध्यप्रदेश

सौ. मीनाक्षी शरण

हिंदुस्थानातील हिंदूंची भूमी ही हिंदूंचे राष्ट्र आहे. इतिहास हा राष्ट्राचे भविष्य ठरवतो. इतिहासाची संपूर्ण माहिती असल्याविना आपण लढू शकणार नाही; कारण इतिहास आपल्या जीवनाशी जोडलेला आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, हा इतिहास आपण विसरू शकत नाही. मौलाना अबुल कलाम म्हणतात, ‘‘धर्मांतर करून आम्ही भारत कह्यात घेऊन त्याचे इस्लामीकरण करू.’’ त्यामुळे आपण आपल्या मुलांना आपला भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे.