पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटेआजोबा (वय ९० वर्षे) यांचा संतसन्मान सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. राजाराम नरुटे

१. पू. राजाराम नरुटेआजोबा यांचा संतसन्मान सोहळा होण्यापूर्वी

सौ. भक्ती गैलाड

अ. ‘सोहळा चालू होण्याआधी साधक सभागृहात बसले होते. त्या वेळी मला वातावरण सामान्य जाणवत होते.

आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु, संत आणि पू. नरुटेआजोबा सभागृहात आल्यावर मला वातावरणात पालट जाणवू लागला. ते सभागृहात आल्यावर मला वातावरण अधिकाधिक चैतन्यमय आणि प्रकाशमय जाणवत होते.

इ. पू. नरुटेआजोबा सभागृहात येत असतांना मला त्यांच्या चालण्यात हलकेपणा जाणवला.

२. पू. राजाराम नरुटेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी

अ. पू. नरुटेआजोबांनी संतपद गाठल्याचे घोषित झाल्यावर मला त्यांचा तोंडवळा आणि डोळे यांमध्ये विलक्षण भाव दिसत होते. ‘ते मायेत असून नसल्यासारखे, म्हणजे सर्वांपासून अलिप्त आहेत’, असे मला जाणवले.

आ. त्यांना संत घोषित केल्यावर मला प्रकाशमय चैतन्यात वाढ झालेली दिसून आली.

इ. माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटली.

ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. नरुटेआजोबांच्या चरणी माथा टेकवून नमस्कार केला. त्या वेळी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्यातील अहंशून्यता जाणवली. परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः शिष्यभावात असतात. सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्याकडे पाहूनही मला तसेच वाटले.

उ. संपूर्ण सोहळ्यात आणि सोहळा संपल्यावरही मला आनंद अनुभवता येत होता. ‘ही केवळ आणि केवळ गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे’, असे मला जाणवले.

‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाच्या साधनेची काळजी घेतात’, त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. भक्ती गैलाड, ठाणे, महाराष्ट्र. (१८.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक