पावसाळ्यात उपयुक्त सनातनची आयुर्वेदातील औषधे

सनातन शुण्ठी (सुंठ) चूर्ण

१. एका वेळचे सर्वसाधारण प्रमाण

‘पाव चमचा

२. चूर्ण कशासह घ्यावे ?

विकारांनुसार कोमट पाणी, तूप आणि गूळ, साखर, मध किंवा दूध

वैद्य मेघराज पराडकर

३. कोणकोणत्या विकारांत उपयुक्त ?

सुंठीचे असंख्य औषधी उपयोग असल्याने तिला आयुर्वेदात ‘महौषध (मोठे औषध)’, असे म्हटले आहे.

३ अ. श्वसनसंस्थेचे विकार : पडसे (सर्दी) आणि पडशातील डोकेदुखी, खोकला, छातीत कफ होणे

३ आ. पचनसंस्थेचे विकार : तोंडाला चव नसणे, वरचेवर ढेकर येणे, अपचन, घशाशी आंबट येणे, घशात आणि छातीत जळजळणे, मळमळणे, उलटी, गॅसेस, पोटात दुखून शौचाला होणे, अतीसार (जुलाब), आव पडणे (अमिबिक डिसेंट्री)

३ इ. प्रजननसंस्थेचे विकार : वीर्यवृद्धीसाठी आणि श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे)

३ ई. अन्य : गर्भवती स्त्रीला आलेला ताप, थकवा, वजन न्यून असणे (शरीर कृश असणे किंवा हडकुळेपणा), आमवात (सांधे आखडणे, तसेच विशेषतः सकाळच्या वेळेत सांधे दुखणे आणि सुजणे), पावसाळ्यात रोग प्रतिबंधक

येथे दिलेले प्रमाण हे सर्वसामान्य माहितीसाठीचे आहे. चूर्णाचे प्रमाण चहाच्या चमच्यानुसार दिले आहे. औषधाचे सविस्तर उपयोग औषधाच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. पत्रक सांभाळून ठेवावे. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२२)