पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या 

लोणी काळभोर (पुणे) – हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीमाळवाडी परिसरात पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या सुनील शिंदे या पोलीस कर्मचार्‍याने २८ जुलै या दिवशी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते पुणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या प्रकरणाची पुढील कारवाई चालू आहे. (आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ? – संपादक)