सध्याच्या लोकशाहीत राजकारणी लोकांचा वेळ एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे !

श्री. विजय वर्तक

‘जनतेवर संस्कार करून तिला घडवणे’, हे राजाचे दायित्व आहे. सध्या राजकारणी लोकांचा वेळ एकमेकांना दोष देण्यात जात असल्याने त्यांचे जनसेवेचे मुख्य कार्य खुंटले आहे. सध्याच्या राजकारणी लोकांचे ध्येय ‘सत्ता टिकवणे’ एवढेच असल्याने ‘शुद्ध आणि सात्त्विक पद्धतीने मानवाची सेवा करणे’, असे राहिले नाही. राजकारणी लोकांचा वेळ शत्रूंशी लढून देशाचे रक्षण करण्यात जात नसून एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे. त्यामुळे भारताची अधोगती होत आहे.’

– श्री. नाना (विजय) विष्णु वर्तक (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड. (९.७.२०२१)