औरंगाबाद (बिहार) येथे १०६ शाळांना असते ‘शुक्रवारी’ सुटी !

औरंगाबाद (बिहार) – जिल्ह्यातील १०६ उर्दू शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ बंद असतात, अशी माहिती शिक्षणाधिकार्‍यांनी दिली; मात्र कुणाच्या आदेशाने शुक्रवारी सुटी दिली जाते, याविषयी कुणालाही ठाऊक नाही. जिल्हा शिक्षणाधिकारी संग्राम सिंह यांनी सांगितले की, पूर्वीपासून शुक्रवारची सुटी आहे. ज्या शाळांमध्ये उर्दू शिकणारे विद्यार्थी आणि मुसलमान शिक्षक यांची संख्या अधिक आहे, तेथे शुक्रवारी सुटी असते. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या दिनदर्शिकेत शुक्रवारच्या सुटीचा उल्लेख आहे.

शिक्षक संघाचे नेते पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले की, मी वर्ष १९९४ पासून शिक्षक आहे. जेव्हापासून उर्दू शाळेमध्ये माझी नियुक्ती झाली आहे, तेव्हापासून शुक्रवारचीच सुटी असते. ती कुणाच्या आदेशाने देण्यात येत आहे, हे मलाही ठाऊक नाही.

संपादकीय भूमिका

  • बिहारमध्ये युती सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा प्रकारे शुक्रवारी सुटी कशी काय असते ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे !
  • आता हिंदूंनी देशभरातून याविरोधात अभियान राबवून त्यांच्या धार्मिक वाराच्या दिवशी सुटी देण्याची मागणी चालू केली पाहिजे, तेव्हाची अशा गोष्टींना चाप बसेल !