अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या प्रकरणी केरळमधील पाद्य्राला अटक

कोझिकोड (केरळ) – केरळमध्ये अन्य राज्यांतून अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या प्रकरणी कोझिकोड रेल्वे संरक्षण दलाने चर्चच्या एका पाद्य्राला अटक केली आहे. जेकब वर्गीस असे आरोपीचे नाव असून तो ‘करुणा चॅरिटेबल ट्रस्ट’चा संचालकही आहे. तो स्वतंत्र पेन्टेकोस्ट चर्चशी संबंधित आहे. कोझिकोड रेल्वे पोलिसांनी जवळपास १२ मुलींची तस्करी करणार्‍या एका मध्यस्थाला अटक केली आहे. लोकेश कुमार आणि श्याम लाल अशी त्यांची नावे असून ते राजस्थानचे रहिवासी आहेत. या मुलींना मंगळवारी गुजरातमधील वडोदरा येथून ओखा एक्स्प्रेसने आणण्यात आले. त्यांना ‘करुणा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या रुणालयात ठेवण्यात येणार होते. सध्या या मुलींना रेल्वे पोलिसांच्या ‘बाल कल्याण समिती’कडे सोपवण्यात आले आहे. मुली गरीब कुटुंबांतील आहेत.

‘करुणा चॅरिटेबल ट्रस्ट’ आवश्यक कागदपत्रांखेरीज कार्यरत असल्याचेही अन्वेषणात उघड झाले आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, अलुवा पुलुवाही येथील रुणालयात मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी ते केरळला आणत होते.

संपादकीय भूमिका

अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !