संभल (उत्तरप्रदेश) येथे मदरशाच्या मौलवीकडून ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

(मौलवी : इस्लामचा धार्मिक नेता)

संभल (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यात मौलवीने मदरशामध्ये शिकण्यासाठी आलेल्या ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मोलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मौलवीला अटक केली.

पीडित मुलगी नेहमीप्रमाणे परिसरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तेथे मौलवी उवेश याने तिला फूस लावून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने कसेबसे घर गाठून घरातील सदस्यांना बलात्काराची माहिती दिली; मात्र पीडित मुलीच्या कुटुंबियांनी अपकीर्तीच्या भीतीने प्रकरण दडपून टाकले आणि ‘या घटनेची माहिती कुणालाही सांगू नकोस’, असे मुलीला बजावले. नंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी आपापसांत चर्चा करून गुन्हा नोंदवला.

संभलचे मुख्याधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मौलवीला कह्यात घेतले आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्‍या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !