चंद्रपूर येथील श्री. साहील बोबडे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

श्री. साहील बोबडे

१. ‘मी रामनाथी आश्रमात पोचल्यानंतर सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांची भेट झाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

२. आश्रमात राहिल्यावर मला ‘गुरुमाऊलींच्या चरणांशी पोचायचे आहे’, अशी ओढ वाटू लागली.

३. भावप्रयोगाच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. एका ताईंनी भावप्रयोग घेतांना सांगितले, ‘‘आता आपण सर्वांनी डोळे मिटूया.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर सूक्ष्मातून गुरुमाऊलींचे चरण दिसून माझी भावजागृती झाली.

आ. ताईंनी भावप्रयोग घेतांना ‘प्रार्थना करूया’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘हे श्रीकृष्णा, तू कुठे आहेस ? आम्ही सगळे आलो आहोत. तू मला भेटला नाहीस.’ त्या वेळी मला ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पुढे बसल्या आहेत’, असे दिसले.

४. आश्रम पहातांना आलेली अनुभूती – आश्रम पहात असतांना मला अखंड भावस्थिती अनुभवता आली.

५. पू. सौरभ जोशी यांना भेटल्यावर आलेल्या अनुभूती

अ. सहसाधिकेने ‘आपण पू. सौरभदादांना (पू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे विकलांग संत) यांना) भेटणार आहोत’, असे सांगितल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.

आ. आम्ही सगळे पू. सौरभदादांच्या खोलीत गेलो. पू. दादांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. पू. दादांकडे पाहून चैतन्य जाणवत होते.

इ. मी पू. दादांना म्हणालो, ‘‘मी चंद्रपूरचा साहील बोबडे !’’ तेव्हा पू. दादांनी मला ‘साहील’, अशी हाक मारली. तेव्हा ‘गुरुमाऊली किती दयाळू आहेत ! ते सर्वांवर किती प्रेम करतात ! त्यांना सगळे ठाऊक असते’, असे मला वाटले.

ई. मी पू. दादांच्या चरणांना स्पर्श केला. तेव्हा ‘ते साक्षात् प.पू. गुरुमाऊलींचे कोमल चरण आहेत’, असे वाटले. मी त्यांना आळवले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी माझ्या हातावर दैवी कण दिसले.

७. संतांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. मला अखंड भावस्थिती अनुभवता आली.

आ. मला सुगंध येत होता.

इ. मला पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.

८. आश्रमात वास्तव्याला असतांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

अ. शांत वाटले.

आ. परेच्छेने वागणे जमू लागले.

इ. गुरुस्मरण होत होते.

ई. नामजप होत होता.

उ. माझ्या मनातील मायेचे विचार न्यून झाले.’

– श्री. साहील बोबडे, चंद्रपूर (नोव्हेंबर २०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक