खाण माफियाने पोलीस उपअधीक्षकांच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडले

चंडीगड – मेवातचे पोलीस उपअधीक्षक सुरेंदरसिंह बिश्नोई यांची खाण माफियांनी हत्या केली. पोलीस पचगाव येथील डोंगराळ भागात अवैध खनन करणार्यांना अटक करण्यासाठी गेले असता खाण माफिया असलेल्या डंपरचालकाने बिश्नोई यांना डंपरखाली चिरडले. या वेळी बिश्नोई जागीच ठार झाले. ते यावर्षी निवृत्त होणार होते. याविषयी नूंह येथील पोलिसांनी, ‘फरार झालेल्या खाण माफियाला शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे’, असे म्हटले आहे.
सौजन्य : India TV
१. बिश्नोई यांना सकाळी ११ वाजता, ‘संबंधित ठिकाणी अवैध खनन होत आहे’, अशी माहिती मिळाली. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ते पोलिसांसह घटनास्थळी पोचले.
२. त्या वेळी घटनास्थळी अवैध खनन करणार्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी डंपरमधून जाणार्या एका खाण माफियाने बिश्नोई याांन धडक मारली आणि त्यांच्या अंगावर डंपर घातला.
३. हरियाणामध्ये याआधीही खाण माफियांनी पोलिसांवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. सोनीपत येथे अवैध खनन करणार्यांना पकडण्यासासाठी गेलेल्या पोलिसांवर खाण माफियांनी आक्रमण केले होते. त्या वेळी खाण माफियांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी फाडली, तसेच एका पोलिसाला मारहाण केली होती.
संपादकीय भूमिकायावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे ! |
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या