ओटावा – कॅनडामध्ये रिचमंड हिल येथील श्री विष्णु मंदिराबाहेर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी निषेध केला असून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
We are deeply anguished by this hate crime that seeks to terrorize the Indian community. It has led to increased concern and insecurity in the Indian community here. We have approached the Canadian government to investigate and ensure perpetrators are brought to justice swiftly. https://t.co/wDe3BUpEWi
— India in Canada (@HCI_Ottawa) July 13, 2022
श्री विष्णु मंदिराच्या बाहेर म. गांधी यांचा ९ फूट उंच ताब्यांचा पुतळा आहे. हा पुतळा देहलीत सिद्ध केला असून तो मे १९८८ मध्ये कॅनडातील श्री विष्णु मंदिराच्या परिसरात बसवण्यात आला. कॅनडातील भारतीय दूतावासाने या घटनेचा निषेध केला आहे. कॅनडामध्ये रहाणार्या भारतीय जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असे प्रकार घडवले जात आहेत. कॅनडा सरकारकडे या प्रकरणी तपास करण्याची मागणी केली असून लवकर आपल्याला न्याय मिळेल, असे ट्वीट कॅनडातील भारतीय दूतावासानेे केले आहे.