प्रयोगाचे उत्तर
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांची सामाईक आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र
१ अ. छायाचित्रे सजीव वाटणे : या छायाचित्रांकडे केवळ समोरूनच नव्हे, तर कुठल्याही दिशेने पाहिले असता ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याकडेच पहात आहेत’, असे वाटते, तसेच ‘त्यांचे डोके आणि खांदेही आपल्या दिशेने वळत आहेत’, असे जाणवते.
१ अ १. शास्त्र : छायाचित्रे सजीव वाटणे, हे परात्पर गुरु डॉक्टरांमधील वाढलेल्या चैतन्याचे दर्शक आहे.
१ आ. प्रत्यक्ष असलेल्या वयापेक्षा वय अल्प वाटणे : सामान्य व्यक्तीमध्ये वयोमानानुसार दिसणार्या त्वचेवरील सुरकुत्या, गालांची खाली ओघळलेली त्वचा, दीर्घकाळ आजारपणाची किंवा थकव्याची चेहर्यावर दिसणारी छटा, वयपरत्वे डोळ्यांतून दिसणारा मलूलपणा, ही लक्षणे परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये जाणवत नाहीत. (वर्ष २०२२ मध्येही वरील लक्षणे परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये जाणवत नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यांची त्वचा अधिकाधिक तुकतुकीत होत असल्याचे छायाचित्रांतूनही दिसते. त्यांचा चेहरा अधिकाधिक तेजस्वी आणि टवटवीत दिसतो. प्रत्यक्ष असलेल्या वयापेक्षा त्यांचे वय अल्प वाटते.)
१ आ १. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांच्या चेहर्यातील पालट, हे त्यांच्यातील वाढलेल्या तेजतत्त्वाचे दर्शक आहे.
१ इ. दृष्टी निर्गुणात असल्यासारखी वाटणे : छायाचित्रे पहातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर शून्यात पहात आहेत’ किंवा ‘त्यांची दृष्टी निर्गुणात आहे’, असे वाटते. वर्ष २०१४ नंतरच्या छायाचित्रांमध्ये हे प्रमाण वाढत गेल्याचे जाणवते.
१ इ १. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांमधील निर्गुण तत्त्व वाढल्याचे हे दर्शक आहे.
१ ई. वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे रुग्णाईत असूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चेहर्यावर तेज जाणवणे : परात्पर गुरु डॉक्टर समष्टीच्या कल्याणासाठी ईश्वरी राज्याच्या स्थापनेकरता अविरत कार्यरत आहेत. याउलट वाईट शक्तींना पृथ्वीवर सर्वत्र ‘आसुरी राज्य’ आणायचे आहे. त्यामुळे वाईट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्याला विरोध करण्यासाठी त्यांच्यावर वर्ष २००० पासून विविध स्वरूपांत आक्रमणे करत आहेत. वाईट शक्तींनी वर्ष २००९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांवर तीव्र स्वरूपात केलेल्या आक्रमणामुळे त्यांच्यावर महामृत्यूयोगाचे संकट ओढवले होते. त्यानंतर ते दीर्घकाळ रुग्णाईतही होते. याच काळात, म्हणजे वर्ष २०१० मध्ये त्यांची प्राणशक्ती अत्यंत अल्प झाली होती. त्यामुळे त्यांना सतत प्रचंड थकवा असे. असे असले, तरी वर्ष २०१० मध्ये काढलेल्या छायाचित्रात त्यांच्या चेहर्यावरून ते तितक्या प्रमाणात आजारी वाटत नाहीत. उलट त्यांचा चेहरा तेजस्वीच वाटतो ! वर्ष २०१२ नंतरच्या छायाचित्रांपासून पुढील छायाचित्रांमध्ये तर त्यांच्या चेहर्यावरील आजारपणाची छटा अल्प होत गेल्याचे दिसत असून, वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रात ती दिसतही नाही.
१ ई १. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांची उच्च आध्यात्मिक पातळी आणि त्यांच्यातील चैतन्य यांमुळे वाईट शक्तींनी त्यांच्यावर केलेल्या आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या आजारपणाचा परिणाम त्यांच्या चेहर्यावर तेवढा दिसत नाही. वर्ष २०१० पासून पुढील वर्षांमध्ये त्यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे वाढलेली असली, तरी त्यांच्यामधील चैतन्य आणि तेजही वाढलेले आहे. त्यामुळे पुढच्या पुढच्या वर्षांतील त्यांच्या छायाचित्रांतील तेज वर्ष २०१० च्या तुलनेत अधिक जाणवत आहे, तसेच त्यांच्या चेहर्यावर दिसणारा आजारपणाचा परिणामही अल्प होत गेल्याचे दिसते. वर्ष २०१७ पासून परात्पर गुरु डॉक्टरांमधील निर्गुण तत्त्वही पुष्कळ प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांचे परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्थूलदेहावरील परिणाम दिसण्याचे प्रमाण अल्प होत गेले असून वर्ष २०२१ मधील छायाचित्रात ते नगण्य असल्याचे जाणवते.
१ उ. वर्ष २०२१ मधील छायाचित्रात परात्पर गुरु डॉक्टरांची त्वचा कोमल, मृदु आणि फिकट गुलाबी, तसेच चेहरा निरागस दिसणे
१ उ १. चेहर्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल आणि मृदु वाटते.
१ उ १ अ. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांमधील वायुतत्त्व वाढल्यामुळे त्यांची त्वचा कोमल आणि मृदू झाली आहे.
१ उ २. चेहर्याची त्वचा फिकट गुलाबी दिसते.
१ उ २ अ. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांमधील प्रीतीमुळे हा पालट दिसतो.
१ उ ३. चेहर्यावरील भाव लहान बाळासारखे निरागस वाटतात.
१ उ ३ अ. शास्त्र : परात्पर गुरु डॉक्टरांमधील अहंशून्यतेमुळे त्यांच्या चेहर्यावरील भाव लहान बाळासारखे निरागस वाटतात.
२. परात्पर गुरु डॉक्टर देवतांच्या ‘चिरतरुण असणे’, या वैशिष्ट्याशी एकरूप होत असल्याचे जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांवरून त्यांचे तत्कालीन वय लक्षात येत नाही. असलेल्या वयापेक्षा ते तरुण वाटतात. चित्रांतील देवताही आपल्याला तरुण दिसतात. यावरून परात्पर गुरु डॉक्टर देवतांच्या ‘चिरतरुण असणे’, या वैशिष्ट्याशी एकरूप होत असल्याचे जाणवते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांमधील दैवी पालटांमागील शास्त्र लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव वाढवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करा !
उपासक, साधक आणि भक्त यांना संतांमधील ईश्वरी तत्त्वाची अनुभूती आलेली असते. सर्वसामान्य लोकांना ‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप’ हे ऐकून वा वाचून ठाऊक असते; मात्र त्यांना या संदर्भात प्रचीती आलेली नसते. संत ईश्वराशी एकरूप होतात, म्हणजे ‘संतांमधील ईश्वरी तत्त्व वाढत गेल्यानंतर त्यांच्यात काय पालट होतात ?’, हे सर्वसामान्यांनाही कळले, तर त्यांची अध्यात्मावरील श्रद्धा वाढून ते साधनेकडे वळतील. या दृष्टीने प्रस्तुत लेख निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यासह या लेखातून साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांची असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात येऊन साधकांची त्यांच्याप्रती श्रद्धा आणि भक्ती दृढ होण्यासही साहाय्य होईल.
‘या लेखाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांची थोरवी सर्वांना कळावी, अधिकाधिक जिज्ञासू साधनेकडे वळावेत आणि साधक, हिंदुत्वनिष्ठ इत्यादींचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भक्तीभाव वृद्धींगत व्हावा’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक आणि कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२२)
परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांचे वेगळेपण ओळखून त्यांचा संशोधनात्मक अभ्यास करणार्या सनातनच्या साधिका !‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विविध प्रसंगी काढलेली छायाचित्रे संग्रहित करणे, त्या छायाचित्रांतून जाणवणारे त्यांचे निराळेपण अभ्यासणे, साधकांना भावजागृतीसाठी उपयुक्त ठरणार्या छायाचित्रांची निवड करणे इत्यादी सेवा सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. पूनम धोंडीराम साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. जान्हवी रमेश शिंदे करतात. प्रस्तुत लेखातील वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रेही या दोघींनी निवडली आहेत. या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये निदर्शनास आणणार्या या दोघींविषयी आम्ही कृतज्ञ आहोत.’ – संकलक |