कन्नूर (केरळ) येथे रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बाँब फेकला !

कन्नूर (केरळ) – येथील पय्यानुरमध्ये असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बाँब फेकल्याची घटना १२ जुलैला सकाळी घडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र यामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची, तसेच कार्यालयातील फर्निचरची हानी झाली. पोलीस सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी सरकार असल्याने तेथे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !