आबे शिंजो हे एका धार्मिक संघटनेशी जोडल्यामुळे त्यांची हत्या

मारेकरी करत होता या धार्मिक संघटनेचा द्वेष !

जपानचे माजी पंतप्रधान आबे शिंजो

टोकियो (जपान) – जपानचे माजी पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. मारेकरी तेत्सुया यामागामी याने सांगितले, ‘मी आबे यांना ठार मारण्याचा कट रचला; कारण मी ज्या धार्मिक संघटनेचा द्वेष करतो, त्या संघटनेशी आबे जोडले गेल्याची अफवा मी ऐकली आणि त्यावर विश्‍वास ठेवला.’