हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे बाळगावीत ! – विश्‍व हिंदु परिषद

चंडीगड – जिहाद्यांपासून असलेला धोका लक्षात घेता हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे समवेत बाळगावीत हिंदूंना शस्त्र परवाने मिळवून देण्यासाठी आम्ही साहाय्य करू, असे राज्यात कार्यरत असलेल्या विश्‍व हिंदु परिषदेने म्हटले आहे.

विहिंपचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती पवन कुमार म्हणाले की, देशविरोधी शक्तींना देश कमकुवत करायचा आहे. जिहाद्यांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.