पाकमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’शी २५ राज्यांतील ३०० लोक संपर्कात !

  • उदयपूर हत्याकांडाचे प्रकरण

  • भारतभरात हत्यासत्रांच्या षड्यंत्राची शक्यता !

उदयपूर (राजस्थान) – येथील कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करणारे गौस महंमद आणि रियाज अत्तारी हे पाकमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’च्या १८ आतंकवाद्यांच्या सतत संपर्क होते. या आतंकवाद्यांच्या भ्रमणभाष क्रमांकांशी भारतातील २५ राज्यांतील ३०० लोकही संपर्कात आहेत, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि गुप्तचर विभाग यांच्या हाती लागली आहे. हे ३०० लोक मुख्यत्वे करून उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, बिहार आणि केरळ येथील आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल यांचा शिरच्छेद आणि महाराष्ट्राच्या अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या यांच्यात पुष्कळ साम्य असल्याने अशा प्रकारच्या हत्यासत्रांच्या षड्यंत्राची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांनी या सर्व २५ राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मुळावर उठलेल्या या जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
  • स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षेच नव्हे, तर गेली १ सहस्र ३०० वर्षे जिहादी आक्रमकांपासून हिंदूंचे रक्षण करण्यात त्या-त्या काळचे शासनकर्ते बहुतेक वेळा अपयशीच ठरले. त्यामुळे आतातरी हिंदूंनी कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:चे, कुटुंबियांचे आणि गावाचे रक्षण करण्यासाठी संघटित होऊन स्वसंरक्षणार्थ सिद्ध होणे ही काळाची आवश्यकता !