बांगलादेशात मुसलमानांनी हिंदु कुटुंबाची भूमी बळकावली

बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदू असुरक्षित !

ढाका – बांगलादेशातील मागुरा येथे एका हिंदु कुटुंबाच्या मालकीच्याभूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून ती बळकावली. हे हिंदु कुटुंब गेल्या २६ वर्षांपासून तेथे वास्तव्य करत होते. या कुटुंबातील महिलेने आतंकवाद्यांनी तिच्या घरावर आक्रमण केल्याची माहिती दिली. सध्या ती तिच्या तीन मुलींसह भयाच्या सावटाखाली रहात आहे. पीडित महिलेने पंतप्रधानांकडे साहाय्य मागितले आहे.