परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगातील मार्गदर्शनपर सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. व्यष्टी साधना चांगली असेल, तर सेवा चांगली होते !

एक साधक : आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी साधनेपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला जाणवायचे, ‘प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला धरून ठेवले आहे. त्यामुळे मी पळून जाऊ शकत नाही.’ मला सेवेची आवड अधिक आहे; पण माझी अंतर्गत (व्यष्टी) साधना होत नाही. त्यामुळे मला वाईट वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : व्यष्टी साधना चांगली होत नसेल, तर सेवाही चांगली होत नाही. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे.

२. आपल्याला समष्टीविषयी प्रेम वाटायला हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले : ईश्वर समष्टीची काळजी घेतो, तर आपल्यालाही समष्टीविषयी प्रेम वाटायला हवे. समष्टीसमवेत प्रेमाने रहाता यायला हवे. यासाठी स्वयंसूचना द्यायला हव्यात आणि त्याचा आढावाही द्यायला हवा. एखादा रुग्ण उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलाच नाही, तर तो बरा कसा होणार ? तसेच हे आहे.

३. वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी वाक्य नेमकेपणे बोलायला हवे !

कु. वैदेही खडसे : कौरवांनी पांडवांवर नारायणास्त्र सोडले होते. हे अस्त्र सोडले जाते, तेव्हा या अस्त्राला कुणी विरोध केल्यास त्याची शक्ती अजून वाढते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : इथे या वाक्याचे २ अर्थ होतात. ‘त्याची शक्ती वाढते’, म्हणजे कुणाची शक्ती वाढते ? अस्त्राची कि अस्त्राला विरोध करणाऱ्याची शक्ती वाढते ?’ आपण बोलत असलेल्या वाक्याचे २ अर्थ होत असल्यास अर्थबोध होण्यासाठी वाक्य नेमकेपणाने बोलायला हवे, उदा. नारायणास्त्र सोडले जाते, तेव्हा या अस्त्राला कुणी विरोध केल्यास अस्त्राची शक्ती अजून वाढते.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक