आषाढ शुक्ल नवमी (८.७.२०२२) या दिवशी जयपूर येथील साधक चि. आकाश गोयल (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, सनातन संस्थेचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांची बहीण सौ. पुष्पा गोयल (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा मुलगा) आणि जमशेदपूर येथील साधिका चि.सौ.का. मधुलिका शर्मा (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. आकाश गोयल आणि चि.सौ.कां. मधुलिका शर्मा यांना शुभविवाहाच्या निमित्ताने सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
|
चि. आकाश गोयल यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. मेघा पातेसरिया, रानीगंज, बंगाल.
१ अ. प्रेमभाव : ‘आकाश यांच्यामध्ये घरातील सर्वांप्रती प्रेम आणि पुष्कळ आदरभाव आहे. ते प्रत्येक गोष्ट सर्वांना अत्यंत सहजपणे सांगतात आणि ते लहान-थोर सर्वांशीच प्रेमाने बोलतात.
१ आ. सर्वांशी समभावाने वागणे : त्यांच्या एका नातेवाइकांना ते साधना करतात, हे आवडत नाही, तरीही आकाश जेव्हा घरी येतात, तेव्हा त्या नातेवाइकांना अवश्य भेटायला जातात.
१ इ. आकाश पुष्कळ सहनशील आणि धैर्यवान आहेत.
१ ई. ऐकण्याची वृत्ती असणे : त्यांच्यामध्ये ऐकण्याची वृत्ती आहे. त्यांना घरात कुणीही काहीही करायला सांगितले, तरी ते सर्वांचे ऐकतात आणि त्यानुसार कृती करतात.’
२. सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), आंध्रप्रदेश, श्री. संतोष शेट्टी आणि सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर, तेलंगाणा.
२ अ. नीटनेटकेपणा : ‘चि. आकाशदादांचे वैयक्तिक साहित्य व्यवस्थित असते. त्यांचे सेवेतील सर्व साहित्य आणि सात्त्विक वस्तू यांची मांडणीही व्यवस्थित असते. दादा सेवाकेंद्रातील स्वच्छताही नीट करतात.
२ आ. परिपूर्ण सेवा करणे : दादा सेवेतील कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करतात आणि इतरांकडूनही करवून घेतात. ते सेवा परिपूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात. सेवेतील लहान बारकाव्यांचे निरीक्षण करतात.’
३. सौ. मीना कदम
३ अ. प्रेमभाव : ‘आकाशदादा साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. ते साधकांच्या घरातील अडचणींच्या संदर्भात आपुलकीने विचारतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो.
३ आ. साधकांना सेवेत साहाय्य करणे : दादांकडे जिल्ह्यातील एका सेवेचे दायित्व आहे. त्या संदर्भात साधकांना सिद्ध करण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. ते साधकांना सेवेत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १.७.२०२२)
पहले से ही ईश्वर नियोजित रहता है, पति-पत्नी का पवित्र बंधन ।
परमदयालु ईश्वर की कृपा से, आषाढ नवमी के शुभ दिन,
विष्णु-लक्ष्मी का तत्त्व सामाहित दो जीवों का हो रहा है मिलन ।
आकाश भैया की वाणी में है नम्रता,
मधुलिका की वाणी में है मधुरता ।
एक जैसा प्रेमभाव है दोनों में,
सभी को बांधते अपनी प्रेम की डोर में ।
दोनों में है गुरु कार्य की लगन,
भावपूर्ण एवं परिपूर्ण गुरु सेवा करने में रहते हैं मगन ।
दोनों ने ठान लिया है, आध्यात्मिक यात्रा साथ में करेंगे,
मोक्षगुरु की कृपा पाकर जीवन सार्थक करेंगे ।
हिन्दू राष्ट्र का ध्येय सदा स्मरण रखेंगे,
शरणागति एवं क्षात्रभाव से प्रत्येक संघर्ष पार करेंगे ।
राधा-कृष्ण के आशीर्वाद से,
रंग जाएं उनकी भक्ति के रंग में ।
यही प्रार्थना विष्णु-लक्ष्मी के श्री चरणों में…
– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२२)
चि.सौ.कां. मधुलिका शर्मा यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रचाराचे कार्य करत असतांना काही वेळा कु. मधुलिकाताई यांच्याशी संपर्क आला असता त्यांच्यातील आध्यात्मिक गुणांविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१ अ. प्रांजळपणा : मधुलिकाताईंमध्ये प्रांजळपणा आहे. त्यांचे व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न झाले, तर ते त्या भावपूर्ण आणि कृतज्ञतापूर्वक सांगतात. प्रयत्न झाले नाही, तरी तेही त्या मोकळेपणाने सांगतात. त्यामध्ये प्रयत्न न झाल्याची खंतही असते. त्यामुळे त्यांच्यात पालटही होतो.
१ आ. स्वतःला पालटण्याची तळमळ असणे : कु. मधुलिकाताईंची प्रकृती समष्टी सेवा करण्याची नाही; मात्र नंतर त्यांनी स्वतःमधे हा गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आणि साधक यांच्याशी नियमित बोलणे, त्यांच्या साधनेचा आढावा घेणे, सेवांचा पाठपुरावा करणे, अशा विविध सेवा मनापासून करतात, हे सहज जाणवते.
२. सौ. पूजा चौहान, रांची, झारखंड.
सहसाधकांना साहाय्य करण्यासाठी नेहमी तत्पर असणे : ‘मधुलिकाताई आमचा व्यष्टी आढावा घेतात. मध्यंतरी माझ्याकडून दोन-तीन सप्ताहापासून साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. तेव्हा त्यांनी मला कठोर शब्दांत प्रयत्न करण्याची जाणीव करून दिली. व्यष्टी आढावा सत्संग संपल्यावर त्यांनी त्वरित भ्रमणभाष करून मला विचारले, ‘‘मी तुम्हाला पुष्कळ कठोर शब्दांत सांगितले नाही ना ?’’ ताईंची मधुरता अशी आहे की, ‘त्या कठोर वाणीत बोलल्या, तरीही त्या आपल्या नेहमीच्या मधुर आवाजातच बोलतात.’
३. कु. एकता राम, देवघर, झारखंड.
३ अ. प्रेमभाव : ‘मधुलिकाताई एवढ्या मधुर आहेत की, त्यांच्याशी बोलतांना समोरच्याला मधुर व्हावेच लागते. तार्ईंमध्ये वात्सल्यभावसुद्धा आहे. आम्ही एकत्र सेवा करत असतांना आरंभी माझ्याकडून चुका होत होत्या. सेवा पूर्ण करण्यासाठी समयमर्यादा असूनसुद्धा मी वेळेत सेवा पूर्ण करू शकत नव्हते. तेव्हा त्या मला वेळेत सेवा पूर्ण करण्यासाठी प्रेमाने प्रोत्साहन द्यायच्या.
३ आ. इतरांना साधनेत साहाय्य करणे : एकदा एका व्यावहारिक अडचणीमुळे मी दुःखी होते; परंतु मी ती गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मधुलिकाताईंच्या माध्यमातूनच मला समजून घेतले. त्यांनी मला विचारून त्यावर योग्य दृष्टीकोन दिला. त्यामुळे माझी अडचण पूर्णपणे सुटली.
४. सौ. सोम गुप्ता, धनबाद, झारखंड.
सेवेला प्राधान्य देणे : ‘मधुलिका ताईंचा विवाह अगदी जवळ येऊन ठेपला असतांनाही त्यांनी सेवेलाच प्राधान्य दिले.’
५. सौ. मेघा पातेसरिया, रानीगंज, बंगाल.
साधकांना आधार वाटणे : ‘साधना किंवा व्यवहार यांविषयी कुणाचीही कोणतीही परिस्थिती असो, आम्ही मधुलिका यांना मोकळेपणाने मनातील सांगू शकतो आणि त्या आम्हाला समजून घेऊन मार्गदर्शन करतात. त्या वयाने आमच्यापेक्षा लहान आहेत; परंतु त्यांचा प्रत्येक परिस्थितीकडे पहाण्याचा दृष्टीकोन अत्यंत व्यापक आहे. त्या आमच्यासाठी आधारस्तंभ आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २९.६.२०२२)