अजमेर दर्ग्याचा सेवेकरी सलमान चिश्ती याला अटक

नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणार्‍याला घर देण्याची घोषणा केल्याने कारवाई

धमकीच्या वेळी सलमान नशेत असल्याचा पोलिसांचा दावा

अजमेर (राजस्थान) – येथील अजमेर दर्ग्याचा खादिम (सेवेकरी) सलमान चिश्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करणार्‍याला घर देईन’, अशी घोषणा करणारा व्हिडिओ सलमान याने प्रसारित केला होता. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. (अजमेर दर्ग्याचे सेवेकरी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत, असेच यातून लक्षात येते ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ? – संपादक) ‘सलमान चिश्ती याने हे विधान केले, तेव्हा तो नशेत होता’, असा दावाही पोलिसांचा केला आहे. (अजमेर दर्ग्याचे सेवेकरी दारू पितात, असे पोलिसांना म्हणायचे आहे का ? हे मुसलमानांना आणि अजमेर दर्ग्याच्या संचालकांना मान्य आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • ‘नशा करा आणि कुणाचाही शिरच्छेद करण्याची धमकी द्या’, असे पोलिसांना म्हणायचे आहे का ? राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते सलमान चिश्ती याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे यातून लक्षात येते. हिंदूंनी या घटनेचा पाठपुरावा करून चिश्ती याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • अजमेर दर्ग्यात मोठ्या संख्येने हिंदू जातात. अशा दर्ग्याचे सेवेकरी कशा मानसिकतेचे आहेत, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !