सॅमसंग आस्थापनाने केलेल्या विडंबनावरून पाकमधील मुसलमान वेडे झाले आहेत ! – तस्लिमा नसरीन

‘सॅमसंग’च्या २७ कर्मचार्‍यांना अटक

तस्लिमा नसरीन

नवी देहली – ‘पाकिस्तानातील मुसलमान ‘सॅमसंग’ आस्थापनाकडून करण्यात आलेल्या विडंबनात्मक ‘क्यूआर् कोड’वरून वेडे झाले आहेत. सॅमसंगच्या कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. मानवी मूर्खपणा अमर्याद झाला आहे’, असे ट्वीट मूळच्या बांगलादेशच्या आणि सध्या भारतात वास्तव्यास असणार्‍या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

‘सॅमसंग’ आस्थापनाकडून झालेल्या पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी कराचीतील ‘स्टार सिटी मॉल’मध्ये ३ दिवसांपूर्वी मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

पोलिसांनी अवमानाच्या प्रकरणी ‘सॅमसंग’च्या २७ कर्मचार्‍यांना अटक केली. या प्रकरणी या आस्थापनाने क्षमाही मागितली आहे.