देहली – देहली विमानतळावरून २ जुलैच्या सकाळी ‘स्पाइसजेट’च्या विमानाने उड्डाण केले. काही मिनिटांतच विमानात धूर पसरला. धुराचे लोट निघाल्यानंतर त्याचे ‘इमरजन्सी लँडिंग’ करण्यात आले (तातडीने भूमीवर उतरवण्यात आले). या वेळी विमान ५ सहस्र फूट उंचीवर होते. विमानात ६०-७० प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. धुरामागील कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
१९ जून या दिवशी बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथेही ‘स्पाइसजेट’च्या विमानातून अचानक धूर निघू लागल्याने त्याचेही तातडीने लँडिंग करण्यात आले होते. प्राथमिक तपासात ‘बर्ड हिट’मुळे (विमानाला पक्षी धडकल्यामुळे) ही घटना घडल्याचे समोर आले होते.