नूपुर शर्मा यांना ‘वेश्या’ म्हणणार्‍या काँग्रेसच्या समर्थक जोत्सना धनखड यांचे ट्वीट ट्विटरने हटवले !

काँग्रेसच्या समर्थक आणि कथित सामाजिक कार्यकर्त्या जोत्सना धनखड

नवी देहली – काँग्रेसच्या समर्थक आणि कथित सामाजिक कार्यकर्त्या जोत्सना धनखड यांनी नूपुर शर्मा यांच्या विरोधात ट्वीट करतांना त्यांना ‘वेश्या’ म्हणत ‘त्यांच्या मृत्यूची वाट पहात आहे’, अशा प्रकारचे लिखाण केले होते. त्याचा विरोध झाल्यानंतरही त्यांनी हे ट्वीट हटवले नव्हते; मात्र ट्विटरने स्वतःहून हे ट्वीट हटवले आहे. काँग्रेसचे नेते मुकेश शर्मा यांनी ‘नूपुर शर्मा यांनी क्षमा मागावी’, असे ट्वीट केले होते. त्यावर जोत्सना धनखड यांनी वरील ट्वीट केले होते.

संपादकीय भूमिका

ट्विटरने ट्वीट हटवले, तरी पोलिसांनी स्वतःहून जोत्सना धनखड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून अटक केली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !