नेपाळमध्ये अवैधरित्या काम करणार्‍या ३ चिनी नागरिकांना अटक

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ पोलिसांनी अवैध कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एका चिनी सॉफ्टवेअर आस्थापनावर धाड टाकून ३ चिनी आणि एक नेपाळी नागरिक यांना अटक केली. त्यांच्याकडून ४६ लाख नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या पैशांचा स्रोत आरोपी दाखवू शकले नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

चिनी नागरिक येथे पर्यटक व्हिसावर आले होते आणि कायद्याचे उल्लंघन करून येथे काम करत होते. नेपाळ हे चिनी गुन्हेगारांसाठी प्रवेशद्वार बनत आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये १२२ चिनी नागरिकांना गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागासाठी अटक झाली होती.