मुंबई – महाराष्ट्रातील मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणातील साक्षीदार हा आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना ओळखण्यात अपयशी ठरला. हा साक्षीदार कथितरित्या दारुगोळा विकणारा परवानाधारक शस्त्र वितरक आहे. याच साक्षीदाराने आधी दिलेल्या साक्षीमध्ये म्हटले होते, ‘वर्ष २००६ पुरोहित माझ्या शस्त्रविक्रीच्या दुकानात आले होते. त्या वेळी ते एक परवाना असलेले शस्त्र घेऊन आले होते, तसेच एकदा पुरोहित यांना स्फोटके विकली होती.’