अटक करतांना पोलीस आरोपीला हातकडी घालू शकत नाहीत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू – कोणत्याही आरोपीला अटक करतांना पोलीस त्याला हातकडी घालू शकत नाहीत, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला.

या वेळी न्यायालयाने आरोपीला हातकडी घालून सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याच्या प्रकरणी आरोपीला दोन लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला.