परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून लक्षात आलेला अर्थ

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांवर प्रीती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीमती स्मिता नवलकर

प – परमार्थाचा मार्ग दाखवणारे ।

रा – रात्रंदिवस साधकांचे रक्षण

करणारे ।

त्प – तत्परतेने साधकांच्या

अडचणी सोडवणारे ।

र – राष्ट्र आणि धर्म यांविषयी

जागृती करणारे ।

गु – मायेचा अंधकार दूर करून

जिवाला मोक्षाचा मार्ग दाखवणारे गुरु ।

रु – साधकांच्या मनात साधनेचे बीज रुजवणारे ।

ज – जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवणारे ।

यं – साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांना यश देणारे ।

त – तपस्वी आणि तेजोमय गुरु ।

आ – आपत्काळात साधकांचे आत्मबळ वाढवून अध्यात्माचे

बीज समाजात रुजवणारे ।

ठ – ठामपणे चुकांची जाणीव करून देणारे, हिंदु राष्ट्र स्थापनेचे

महत्त्व सांगणारे ।

व – वटवृक्षाप्रमाणे साधकांना प्रीतीची छाया देणारे ।

ले – लेकरांची प्रगती करवून घेऊन त्यांना मोक्ष प्रदान करणारी

गुरुमाऊली ।

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.८.२०२१)