अमेरिकेतील गर्भपातावरील बंदीच्‍या निर्णयाला ज्‍यू आणि मुसलमान यांचा विरोध

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकन सर्वोच्‍च न्‍यायालयाने गर्भपातावर बंदी घातल्‍याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या निर्णयाला अमेरिकेतील ज्‍यू आणि मुसलमान यांनी विरोध दर्शवला आहे.

१. ज्‍यूंच्‍या अनेक संघटनांनी हा निर्णय त्‍यांच्‍या धार्मिक परंपरांचे उल्लंघन असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांच्‍या परंपरेनुसार ‘गर्भपात आवश्‍यक असल्‍यास तो केला पाहिजे.’ ज्‍यू महिलांच्‍या राष्‍ट्रीय परिषदेच्‍या प्रमुख शीला काट्‍ज म्‍हणाल्‍या की, ‘गर्भपातावरील बंदीचा निर्णय गर्भवती महिलांच्‍या तुलनेत गर्भाच्‍या जिवाला अधिक महत्त्व देणारा आहे. हे ज्‍यू धर्मियांचे कायदा आणि परंपरा, तसेच अमेरिकेतील धार्मिक स्‍वतंत्र्य, यांचे उल्लंघन आहे.

२. प्रजनन अधिकारांवर काम करणार्‍या शिकागो येथील ‘हार्ट वूमन अँड गर्ल्‍स’ या संघटनेच्‍या नादिया मोहजिर यांनी या निर्णयावर अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे. ‘अर्ध्‍याहून अधिक अमेरिकी मुसलमान गर्भपाताच्‍या सुरक्षित पद्धतीचे समर्थन करतात’, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

३. गर्भपातावर बंदी आणण्‍यामागे अमेरिकन सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘प्रत्‍येकाला जीवन जगण्‍याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे जन्‍माला येणार्‍या लाखो निष्‍पापांचा जीव वाचणार आहे’, असे स्‍पष्‍ट केले आहे.