नॉर्वे येथे झालेला गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच ! – पोलीस

ऑस्लो (नॉर्वे) – येथे २५ जूनच्या रात्री लंडन क्लब, हेर नेल्सन क्लब आणि एक पब अशा ३  ठिकाणी गोळीबार करणार्‍याला अटक करण्यात आली आहे. या गोळीबारात २ लोक मृत्यूमुखी पडले, तर २१ जण घायाळ झाले.

पकडण्यात आलेला आरोपी हा मूळचा इराणचा असून तो एका आतंकवादी संघटनेशी संबंधित असून त्याने केलेले आक्रमण हे आंतकावादी आक्रमणच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.