ट्युनिशिया आता इस्लामी देश नसणार !

ट्युनिशियाचे राष्ट्रपती कैस सैईद

ट्युनिस (ट्युनिशिया) – आफ्रिका खंडातील इस्लामी देश ट्युनिशियामध्ये गेल्या वर्षी सत्तापालट झाल्यानंतर आता तेथे राज्यघटनेच्या प्रारूपाला संमती देण्यात आली आहे. त्यामुळे ट्युनिशिया आता इस्लामी देश नसणार आहे. ही राज्यघटना आता जनमत संग्रहासाठी लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे.

ट्युनिशिया हा मुसलमानबहुल देश आहे. तरीही येथे शरियत कायद्याचे पालन केले जात नव्हते. येथील कायदे युरोपीय कायद्यांनुसार होते. देशातील ८० टक्के जनता इस्लामी राजकारणाच्या आणि कट्टरतेच्या विरोधात आहे.