तृणमूल काँग्रेसचे नेते अनारूल हुसैन हेच मुख्य सूत्रधार ! – सीबीआय

हुसैन यांनी पोलिसांना सांगितले, ‘‘गाव जळत आहे, ते जळू दे, तुम्ही येण्याची आवश्यकता नाही !’’

बंगालच्या बीरभूम अग्नीकांडाचे प्रकरण

अनारुल हुसैन

कोलकाता (बंगाल) – राज्यातील बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची हत्या झाल्यावर २१ मार्चच्या रात्री त्यांच्या समर्थकांनी तोडफोड करून, तसेच आग लावून केलेल्या हिंसाचारात १० लोकांचा जळून मृत्यू झाला होता. याचे अन्वेषण करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने ९० दिवसांनंतर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या आरोपपत्रानुसार रामपूरहाटचे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनारुल हुसैन हे या आक्रमणाचे मुख्य सूत्रधार आहेत.

शेख यांची हत्या झाल्यानंतर हुसैन यांनीच तेथे जमा झालेल्या शेख यांच्या समर्थकांना हिंसा करण्यासाठी चिथावणी दिली होती, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यासह हुसैन यांनीच पोलिसांना दूरभाष करून सांगितले होते, ‘‘गाव जळत आहे, ते जळू दे, तुम्ही येण्याची आवश्यकता नाही.’’ अन्वेषण विभागाने दावा केला आहे की, गावातील अनेक लोकांनी अनारूल हुसैन यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना बोलावण्याची विनंती केली होती; परंतु हुसैन यांनी लोकांना साहाय्य केले नाही, उलट पोलिसांना न येण्याविषयी सांगितले.

संपादकीय भूमिका 

  • जर सीबीआयने केलेल्या दाव्यात सत्यता असेल, तर अनारूल हुसैन यांच्यासह संबंधित आक्रमणकर्त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !
  • लोकांना जिवंत जाळण्यास कारणीभूत असलेल्या अनारूल हुसैन यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकामध्ये कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !