१. नवीन सेवा शिकवतांना सहसाधकाला सेवेची व्याप्ती प्रेमाने सांगणे
मी सोशल मिडियाची (सामाजिक माध्यमाची) सेवा शिकत होतो. या सेवेमध्ये ‘साधकांशी समन्वय कसा करावा ? सेवेची व्याप्ती कशी असते ?’, याविषयी ताईने मला एखाद्या लहान मुलाला हात धरून शिकवावे, तशा प्रकारे सर्व सेवा शिकवल्या. या सेवांमध्ये माझ्याकडून किंवा अन्य साधकांकडून काही चुका झाल्यास ताई त्या चुका आणि त्यांचा होणारा परिणाम तितक्याच प्रेमाने सांगते.
२ . सेवेची तळमळ
स्नेहलताई शिक्षणानिमित्त सांगली येथे रहात होती. शिक्षण घेत असतांना ती सेवा करायची. तिच्या बाबांची प्रकृती बरी नसल्याने तिला घरी जावे लागत होते, तरीही ती घरी राहूनही सेवा चालू ठेवत असे. तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतरही अवघ्या काही दिवसांत तिने सेवा चालू केली.
– श्री. हर्षद ढमाले, सांगली ( मे २०२२)