अररिया (बिहार) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञात धर्मांधांनी केली मूर्तीची नासधूस

अन्य धर्माचा ध्वज फडकावला

अररिया (बिहार) – काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला. (हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक) भाजपचे खासदार प्रदीपकुमार सिंह यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला असून पोलिसांना देवतेची विटंबना करणाऱ्यांना २४ घंट्यांच्या आत अटक करण्याची मुदत दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.