१. नम्र आणि स्थिर
श्री. सुनील घनवट नाशिक येथे दौऱ्यावर आले असतांना अर्ध्या घंट्यासाठी आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना ‘ते अतिशय स्थिर आहेत’, असे मला जाणवले. मला त्यांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता जाणवली.
२. प्रेमभाव
आमच्या घरी आल्यावर सुनीलदादांनी पुष्कळ प्रेमाने आणि आपलेपणाने माझ्या सासूबाईंची विचारपूस केली.
३. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे
दादांचे साधनेचे दृष्टीकोन स्पष्ट आहेत. त्यांनी आमच्या (मी आणि माझे यजमान श्री. अमित देखणे यांच्या) मनातील साधनेविषयीच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यानंतर २ दिवसांनी त्यांनी आम्हाला भ्रमणभाष करून ‘तुमच्या मनातील साधनेविषयीच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत ना ?’, असे प्रेमाने विचारले. ‘आमच्याकडून साधनेचे प्रयत्न जोमाने व्हावेत’, याची त्यांनाच अधिक तळमळ आहे’, हे पाहून आम्हाला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.
४. ‘सुनीलदादांसारखे अनेक गुणांनी युक्त असलेले साधक, म्हणजे देवाने घडवलेले हिरेच आहेत’, असे मला वाटले.
‘माझ्याकडूनही सुनीलदादांसारखे साधनेचे प्रयत्न तळमळीने होऊ देत’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना आहे.
– सौ. आदिती देखणे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. (५.११.२०२१)