अफगाणिस्तानातील भूकंपात २५५ जण ठार

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानात २२ जूनच्या सकाळी झालेल्या ६.१ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५५ जणांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून ४० किमी अंतरावर होता. या भूकंपाचा प्रभाव ५०० किमीच्या परिघात होता. त्यामुळे अफगाणिस्तानसह पाकिस्तान आणि भारत येथेही  भूकंपाचे धक्के जाणवले.