आंदोलनाच्या वेळी काँग्रेसच्या नेत्या नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या !

राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ देहलीत करत होत्या आंदोलन

नवी देहली – ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणी  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून)  चौकशी करण्यात येत आहे. याविरोधात काँग्रेसकडून देशात आंदोलन करण्यात येत आहेत. देहली येथील आंदोलनाच्या वेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचार्‍यांवर थुंकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांना कह्यात घेतले आणि बसमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा नेट्टा डिसोझा पोलीस कर्मचार्‍यांवर थुकंल्या. याविषयी स्पष्टीकरण देतांना डिसोझा यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवरून माझ्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. या व्हिडिओमध्ये माझे केस कसे ओढले गेले ?, चिखलात कसे ढकलले गेले ? हे दाखवले आहे. चिखल, धूळ आणि केस माझ्या तोंडात गेले, जे मी माझ्या तोंडातून बाहेर काढले. सुरक्षा कर्मचार्‍यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.

संपादकीय भूमिका

काँग्रेसवाल्यांची विकृती ! पोलिसांशी असे वागणारे नेते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा !