(म्हणे) ‘रणवीर यांनी मंदिरात नव्हे, तर दुर्गापूजेच्या मंडपात प्रवेश करतांना बूट घातले आहेत !’

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या विज्ञापनात अभिनेते रणवीर कपूर यांनी मंदिरात बूट घातल्यावरून निर्माता-दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे स्पष्टीकरण

मुंबई – ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या विज्ञापनात अभिनेते रणवीर कपूर हे मंदिराच्या आत बूट परिधान करून जात असल्याचे एक दृश्य आहे. यास हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावरून याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, रणवीर यांच्या पात्राने बूट घातल्याच्या दृश्यावरून लोक अप्रसन्न आहेत. चित्रपटाचा निर्माता या नात्याने मी सांगू इच्छितो की, आमच्या चित्रपटात रणवीर मंदिरात प्रवेश करत नसून दुर्गापूजेच्या मंडपात प्रवेश करत आहे. माझे स्वतःचे कुटुंब ७५ वर्षांपासून दुर्गापूजेचे आयोजन करत आहे. मी लहानपणापासून त्यात सहभागी होत आहे. माझ्या अनुभवानुसार आम्ही देवीच्या व्यासपिठावर जाण्यापूर्वीच बूट काढतो, मंडपात नाही.’

संपादकीय भूमिका

  • बॉलिवूडचा हिंदुद्रोही इतिहास पहाता अयान मुखर्जी यांच्या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवील ? चित्रपटात अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या स्थळी असे दृश्य दाखवण्याचे धाडस मुखर्जी यांनी दाखवले असते का ?
  • हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचा जाणूनबुजून अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर बहिष्कार घालून असे हिंदुद्रोही दिग्दर्शक, कलाकार, निर्माता आदींना हिंदूऐक्याची चुणूक दाखवा !