पाकने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने इस्लामाबादमध्ये रात्री ९ नंतर व्यवसाय रहाणार बंद

लाहोरमध्ये आधीच घेण्यात आला निर्णय !

इस्लामाबाद – पाकिस्तानने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने राजधानी इस्लामाबादमधील दुकाने आणि आस्थापने रात्री ९ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजकपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश पुढील २ मासांसाठी लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानचे सर्वांत मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये हा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे.