केंद्र सरकारकडून अग्नीपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ

नवी देहली – सैन्याच्या तिन्ही दलांत तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील तरुणांकडून जोरदार विरोध केला जात आहे. अशात केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत सैन्य भरतीसाठीची असलेली वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे इतकी केली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे. गेल्या २ वर्षांत एकदाही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. या योजनेच्या अंतर्गत तरुणांना संरक्षण दलात ४ वर्षे सेवा करता येणार आहे.